आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी जिल्हा सज्ज
पिंपरी, ता. १८ ः पुणे, पिंपरी चिंचवडसह लगतच्या ग्रामीण भागात मंगळवारपासून (ता. २०) ‘पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होत आहे. या निमित्ताने पिंपरी चिंचवडसह आयटीनगरी हिंजवडीसह मुळशी व मावळ तालुक्यातील टूर मार्गावरील रस्ते चकाचक झाले असून स्पर्धेची जय्यत तयारी झाली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडसह स्पर्धेच्या मार्गातील जवळपास ४३७ किलोमीटरचे चकाचक केले आहेत. यात पिंपरी चिंचवडमधील ५३ किलोमीटर आणि ग्रामीण भागातील २९० किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे. सर्व रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले असून कडेचा राडारोडा उचलला आहे. रस्त्यांची रंगरंगोटी, स्पर्धेसंदर्भात ठिकठिकाणी चित्र रंगवले आहे. मंगळवारी (ता. २०) पिंपरी चिंचवडसह मावळ व मुळशी तालुका आणि गुरुवारी (ता. २३) पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील रस्त्यांवर स्पर्धेचा थरार बघायला मिळणार आहे.
काय कामे केली...
- पिंपरी चिंचवडसह मुळशी व मावळ तालुक्यातील स्पर्धेच्या मार्गातील रस्ते आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या मानांकानुसार केलेत
- पदपथांसह पथदिव्यांच्या खांबांची, रस्ता दुभाजकांची रंगरंगोटी केली
- सांडपाणी वाहिन्यांच्या चेंबर्ससह गतिरोधकांची उंची बदलली
- काही ठिकाणी पथदिवे नवीन बसवले
- रस्तेच्या कडेला सायकल स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करणारे चित्र रंगवले
उद्योगनगरीतील स्पर्धेचे मार्ग
मंगळवार (ता. २०) ः ८७.२ किलोमीटर ः मुळशी व मावळ तालुक्यांसह पिंपरी चिंचवड शहर ः टीसीएस सर्कल हिंजवडी- माण- अंबडवेट- पौड- चाले- नांदगाव- कोळवण- हाडशी- जवण- तिकोणा पेठ- काले- कडधे- थूगाव- शिवणे- डोणे- शिवले- आढले बुद्रूक- बेबडओहोळ- चंदनवाडी- चांदखेड- कासारसाई- नेरे- मारुंजी- लक्ष्मी चौक- भूमकर चौक- डांगे चौक- संत नामदेव महाराज चौक चिंचवड- डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल रावेत.
गुरुवार (ता. २३) ः ९५ किलोमीटर ः पुणे व पिंपरी चिंचवड शहर ः श्री शिव छत्रपती स्पोर्टस् कॉम्पलेक्स महाळुंगे बालेवाडी स्टेडियम- पाषाण- एमसीएस ग्राऊंड- सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक- राजीव गांधी पूल औंध- रक्षक चौक पिंपळे निलख- काळेवाडी फाटा- डांगे चौक- संत तुकाराम महाराज पूल रावेत- स्वामी विवेकानंद चौक- भक्तीशक्ती चौक निगडी- त्रिवेणीनगर चौक- केएसबी चौक- टाटा सर्कल- इंद्रायणीनगर चौक- इंद्रायणीनगर- पीसीएनडीटीए सर्कल- स्पाइन रोड-
केएसबी चौक- एम्पायर इस्टेट सोसायटी पूल- तापकीर चौक काळेवाडी- काळेवाडी फाटा- रक्षक चौक- राजीव गांधी पूल औंध- विद्यापीठ चौक- नळ स्टॉप चौक- भेलके चौक- नळ स्टॉप चौक- शनिवारवाडा- लक्ष्मीनारायण चौक- सेव्हन लव चौक- टर्फ क्लब- नॅशनल वार मेमोरियल- साधू वासवानी चौक- साखर संकुल- एफसी रोड- बालगंधर्व रंगमंदिर पुणे.
---
पुणे ग्रॅंड चॅलेंज टूरसाठी नियोजित केलेले रस्ते आंतरराष्ट्रीय रायडिंग स्टॅंडर्डप्रमाणे तयार केले आहेत. स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले असून त्या अनुषंगाने सर्व कामे केली आहेत. सायकल स्पर्धेबाबत जनजागृती केली जात आहे. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पहिल्यांदाच शहरात होत आहे. यामुळे सायकलिंगचे महत्त्व शहरातील नागरिकांना कळणार आहे. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा आपला पुणे जिल्हा यजमान आहे. यामुळे ग्रामीण भागासह पिंपरी चिंचवडही या निमित्ताने आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकणार आहे. राहण्यायोग्य शहर असल्याचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे. शिवाय, पर्यटन, आयटी, उद्योग, ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढणार आहे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका, पिंपरी चिंचवड
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

