औद्योगिक स्पर्धा महिनाअखेरीस सुरू

औद्योगिक स्पर्धा महिनाअखेरीस सुरू
Published on

पिंपरी, ता. १८ ः औद्योगिक क्रीडा संघटनेच्या वतीने आयोजित २०२६-२७ या वर्षांतील विविध क्रीडा स्पर्धांचा चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जलतरण स्पर्धेने प्रारंभ होणार आहे.
जलतरण स्पर्धा सँडविक एशियातर्फे आयोजित करण्यात येणार आहे. आकुर्डी येथील बजाज ऑटोमध्ये ६ सप्टेंबरला योग स्पर्धा होणार आहे. याखेरीज, सप्टेंबर महिन्यात वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कॅरम, ऑक्टोबरमध्ये बुद्धिबळ, टेबल टेनिस डिसेंबरमध्ये फुटबॉल, सिंहगड चढणे, ॲथलेटिक्स तर जानेवारीत बॅडमिंटन, क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात शूटिंगबॉल, व्हॉलीबॉल पासिंग आणि मार्च महिन्यात कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुक खेळाडूंनी संघटनेचे सचिव वसंत ठोंबरे, उपाध्यक्ष नरेंद्र कदम आणि स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन औद्योगिक क्रीडा संघटनेचे खजिनदार प्रदीप वाघ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com