वाचक पत्र

वाचक पत्र
Published on

खड्ड्यांतून रस्ता शोधणाऱ्या नागरिकांची फरफट
पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर देशातील बहुतांश शहरांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. माणूस चंद्रावर पोहोचला असून आता मंगळावर स्वारी करण्याची तयारी करत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गगनभरारी घेत असतानाही शहरातील रस्ते दर्जेदार आणि टिकाऊ करण्याची क्षमता आपल्यात निर्माण झालेली नाही. चांगले आणि टिकाऊ रस्ते बांधणे हे काही अशक्य किंवा फार कठीण काम नाही. मात्र, दर पावसाळ्यात रस्ते खराब होणे आणि त्यानंतर दरवर्षी दुरुस्तीसाठी नवीन निविदा काढल्या जाणे, हीच जणू व्यवस्था बनली आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, अधिकारी किंवा ठेकेदार कोणतेही असोत आणि लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असोत, रस्त्यांच्या गुणवत्तेबाबतची ही परिस्थिती बदलताना दिसत नाही. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसान, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढतो. काही वेळा या अपघातांमध्ये नागरिकांना जीवही गमवावा लागतो. त्यामुळे रस्ते बांधकामात केवळ निधी खर्च करण्यापेक्षा त्याची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.
- शिवराम वैद्य, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com