गणेशोत्सवासाठी एसटीच्या १५० विशेष बस

गणेशोत्सवासाठी एसटीच्या १५० विशेष बस
Published on

पिंपरी, ता. १९ : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने आरक्षण सुविधा सुरू केली आहे. १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणराय आगमनानिमित्त पुणे विभागातून १५० विशेष बस सोडण्यात येणार असून, १० ते १३ सप्टेंबरदरम्यान स्वारगेट आणि पिंपरी चिंचवड आगारातून या बस सुटतील.
‘‘पिंपरी चिंचवड आणि भोसरी, चाकण एमआयडीसी परिसरातील नोकरदार व विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने हे नियोजन केले आहे. विशेषतः कोकणातील चिपळूण, दापोली, देवरूख, गुहाघर, खेड, रत्नागिरी, सावंतवाडी तसेच मराठवाडा आणि विदर्भासाठी या बस उपलब्ध असतील. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार फेऱ्या वाढवण्यात येतील. भाविकांसाठी ‘ग्रुप बुकिंग’चा पर्यायही उपलब्ध आहे. ठराविक प्रवाशांचा गट असल्यास त्यांना घराजवळून थेट इच्छित स्थळापर्यंत बस उपलब्ध करून दिली जाणार आहे,’’ असे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.

तीन दिवसांत सहा बस ‘फुल’
आरक्षण सुरू होताच पहिल्या तीन दिवसांत सहा बसचे बुकिंग पूर्ण झाले आहे. १० ते १३ सप्टेंबर या कालावधीतील प्रवासाला नागरिक सर्वाधिक पसंती देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com