नागरीकांच्या समस्या

नागरीकांच्या समस्या

Published on

फुलजाई चौकात कचऱ्याचा ढीग
फुलजाई चौकात, शिंदे वस्तीतील गणपती मंदिराजवळ ३०७ क्रमांकाच्या बस थांब्याजवळील हे दृश्य पाहून लक्षात येईल की तिथे रोज येणारे जाणारे व आजूबाजूचे नागरिक किती कचरा व कचऱ्याच्या पिशव्या टाकत असतात. शेजारीच मोडकळीला आलेली गटाराची जाळी आहे. त्याच्याजवळ मैलायुक्त घाणपाणी वाहत असते. तेथे कचरा रोजच्या रोज साफ करणे शक्य नसेल, तर तिथे मोठ्या आकाराची कचरा कुंडी ठेवावी. घाणीचा त्रास, भटक्या श्वानांची कटकट संपण्यासाठी कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांनी भानावर यावे. संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करावी.
- श्रुती धोंगडे, शिंदे वस्ती, रावेत
PNE26W02372

बारणे चौकात सिग्नल हवा
थेरगाव ते चिंचवड बटरफ्लाय पुलामुळे रहदारीत लक्षणीय वाढ झाली आहे. उत्तम सोयी आणि शार्टकटचा फायदा नागरिकांना होत आहे. आता बाजीराव बारणे चौकात मध्यभागी खांब रोवून गतिरोधक व झेब्रा पट्टे, सिग्नलसह बसविणे नितांत आवश्यक व गरजेचे आहे. अन्यथा रस्ता ओलांडणे दुरापास्तच. महापालिकेने दखल घेऊन उपाययोजना करावी.
- रमेश पाटील, थेरगाव
PNE26W02373

गटाराचे झाकण त्वरीत बदला
चिंचवडगावातील केशवनगर शाळेजवळच्या रस्त्यावरील गटाराचे झाकण उघडले असून ते कधीही पडण्याची शक्यता आहे. तरी महापालिका प्रशासनाने हे झाकण त्वरीत बदलून अपघाताचा धोका टाळावा.
- रमेश देव, चिंचवड
PNE26W02371

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com