वडापाव, चायनिज पदार्थ विक्रेते संकटात

वडापाव, चायनिज पदार्थ विक्रेते संकटात

Published on

पिंपरी, ता. १३ : कमी पैशांत भूक भागवणारा पदार्थ म्हणून वडापावला मागणी असते. तर, अनेकांना चायनिज पदार्थही आवडतात. खिशात मोजके पैसे असले, तरी अनेकांची भूक या पदार्थांनी भागते. पण, आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच मिळत नसल्याने वडापाव आणि चायनीज फूड व्यावसायिक हतबल झाले आहेत. विशेषत: ‘स्ट्रीट फूड’ व्यवसायाला जबर फटका बसला आहे.
शहरातील उपनगरांत अनेक ठिकाणी, चौका-चौकांतील लाडका वडापाव, गरमागरम समोसे आणि भजी मिळेनाशी झाली आहेत. तसेच
‘चायनीज फूड’ व्यवसाय विस्कळित झाला आहे. शहरातील अनेक व्यावसायिकांकडील गॅसचा साठा संपला आहे. त्यामुळे त्यांनी व्यवसाय बंद ठेवला आहे.

पाव, ब्रेड उत्पादनावर परिणाम
बेकरीमधील पाव-ब्रेडदेखील संकटात आहेत. पाव-ब्रेडच्या पुरवठ्यावरही आता संकट निर्माण झाले आहे. काही ठिकाणच्या बेकरींकडूनच गॅसच्या भट्टीचा वापर सुरू झाला होता. आता छोटे बेकरी व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पावाच्या उत्पादनावर परिणाम झालेला. आता, गॅसच्या टंचाईमुळे पाव-ब्रेडचे उत्पादन कमी होण्याची भीती आहे.

आर्थिक उत्पन्नही बंद
गॅस मिळत नलसल्याने अनेक स्टॉल बंद पडले आहेत, ज्यामुळे छोट्या व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहक येत आहेत; पण पदार्थ तयार करता येत नाहीत. त्यामुळे आर्थिक उत्पन्नही बंद झाले आहे. काही गाड्यांनी तरी घरगुती सिलेंडर वापरून ‘जुगाड’ चालवण्याचा प्रयत्न केला, पण पुरवठा पुरेसा नसल्यामुळे फटका बसला आहे.


रिक्षा-टॅक्सीचालक आणि सामान्य कामगारांची भूक भागवणारे हे पदार्थ गॅसअभावी मिळणे कठीण झाले आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळत नाही. त्यात खाद्यतेलाचे भाव वाढल्याने वडापाव विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. वडापाव विक्रेत्याला दररोज दोन ते तीन सिलिंडर लागतात. मात्र आता वडापाव विक्रेत्यांना गॅस सिलिंडरसाठी सकाळपासून फिरावे लागत आहे.
- रवी शिंदे, वडापाव विक्रेता, पिंपरी

PNE26W03411

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com