फसवणूक प्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा

फसवणूक प्रकरणी
दोन डॉक्टरांवर गुन्हा
Published on

पिंपरी, ता. १८ : मेडिकल दुकान परवान्यासाठी बनावट सह्या व खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन डॉक्‍टरांवर गुन्‍हा दाखल झाला. मोशीतील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात हा प्रकार घडला. डॉ. प्रशांत मधुकर पाटील-कांबळे (रा. नायर कॉलनी, साने चौक, चिखली) आणि डॉ. रविकांत अशोक हडपद-चिंचवडे (रा. चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ) अशी डॉक्टरांची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय मोहन सिंग राठोड यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. मोशी येथे तळवडे मेडिकल शॉप नावाने दुकान आहे. आरोपींनी भागीदारीतील परवाना रद्द करण्यासाठी अर्जावर व संमती पत्रावर बनावट सह्या केल्या. ते दस्ताऐवज खरे असल्याचे भासवून कार्यालयाकडून परवाना रद्द करून घेवून स्वतःच्या नावे केला. तसेच रविकांत यांनी मेडिकल शॉपचा परवाना फॉर्म नंबर-२० मध्ये परस्पर बदल करून प्रशांत यांचे नाव कमी करून एकट्याचेच नाव परवान्यावर नमूद करून शासनाची फसवणूक केली. तसेच भारती एक्सा लाईफ चिंचवड शाखेकडून कर्ज घेतले. प्रशांत यांनी खोट्या सह्या, खोटी कागदपत्रे तयार करून ते खरे असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केली तर रविकांत यांनी भागीदारी परवान्यात बनावटीकारण करून शासनाची फसवणूक केली.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com