

पिंपरी : चिखली येथील ‘सेक्टर १२’ गृहनिर्माण प्रकल्पात अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत ‘पीएमआरडीए’ने उभी केली आहे. ही माहिती ‘पीएमआरडीए’च्या मुख्य महानगर अभियंता रिनाज पठाण यांनी दिली. या कामगिरीची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १४) चिखली येथील प्रकल्पस्थळी आयोजित सोहळ्यात ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे परीक्षक अशोक अदाक यांनी अधिकृत प्रमाणपत्र व पदक देऊन ‘पीएमआरडीए’चा गौरव केला.
यावेळी मुख्य वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, बांधकाम परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, कार्यकारी अभियंता विद्याधर शिंदे, उपअभियंता रश्मी पाटील, वाय. पी. काजळे, एन. एम. कदम, जे. सी. राक्षे उपस्थित होते. सूत्रसंचालन कविता भिडे यांनी केले, तर आभार एन. एम. कदम यांनी मानले.
------------
दृष्टिक्षेपात विक्रमी बांधकाम :
- इमारत : १४ मजली निवासी इमारत (डी-३) एलआयजी
- एकूण क्षेत्रफळ : ९४,७२२ चौरस फूट
- सदनिका : ११२ (२ बीएचके)
- कालावधी : केवळ ९५ दिवस
- तंत्रज्ञान : प्रीकास्ट आरसीसी (इंडस्ट्रियलाइज्ड ३-एस सिस्टिम)
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.