गुरव समाजाचे आझाद मैदानावर आंदोलन
पिंपरी, ता. १० : गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्या मांडण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर १७ मार्चला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शीतल शिंदे यांनी दिली आहे.
या आंदोलनाची सुरुवात सकाळी १० वाजता होणार आहे. आंदोलन संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली आणि जेजुरी नगरपालिका नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांच्या नेतृत्व करणार आहेत. या मागण्यांमध्ये प्रामुख्याने ‘‘देवस्थान इनाम वर्ग-३ च्या जमिनींचा प्रश्न मार्गी लावून त्यावरील वतन खालसा करणे, जमिनींचा फेरसर्व्हे करून बेकायदेशीर हस्तांतरण रद्द करणे आणि मूळ सनदधारकांना ताबा मिळवून देणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. तसेच सर्व मंदिर ट्रस्टमध्ये गुरव समाजाला ५० टक्के विश्वस्त पदे मिळावीत, पुजाऱ्यांचा वंशपरंपरागत पूजेचा हक्क अबाधित राहावा आणि ६० वर्षांवरील पुजाऱ्यांना निवृत्ती वेतनासह पाच हजार रुपये दरमहा मानधन तातडीने लागू करावे,’’ अशा मागण्या समाजाने मांडल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

