गॅस वितरक एजन्सी, हॉटेलची झडती

गॅस वितरक एजन्सी, हॉटेलची झडती

Published on

पिंपरी, ता. १२ : गॅस सिलिंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पथकाने शहरातील विविध कंपन्यांच्या गॅस सिलिंडर वितरक एजन्सी आणि हॉटेलची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी केली. या वितरकांकडे असलेला प्रत्यक्ष साठा आणि ऑनलाइन नोंदी, तसेच बुकिंगपेक्षा अधिक सिलिंडर वाहतूक केली जात आहे का, याची पडताळणी केली.

हॉटेल तसेच रेस्टॉरंट चालवणाऱ्यांना व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी, त्यांच्याकडून घरगुती गॅसचा वापर सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे घरगुती गॅस वापरणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी साठेबाजी व काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या तपासणीसाठी पिंपरी चिंचवड शहरात दोन पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात तीन विभागीय अधिकारी व दोन पुरवठा निरीक्षक आहेत. या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आलेल्या तक्रारीनुसार धाडी टाकून घरगुती गॅसचा अवैध वापर केला जात आहे का, याची शहानिशा केली या पथकाने गुरुवारी (ता. ११) कासारवाडी, चिंचवडगाव आणि रावेत परिसरातील सहा गॅस वितरक एजन्सींची तपासणी केली. यावेळी गॅस सिलिंडर घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १२) पथकाने देहूरोड, औंध-रावेत बीआरटी रस्ता परिसरातील गॅस वितरक एजन्सींची, तसेच काही हॉटेलवर धाडी टाकून घरगुती गॅसचा अवैध वापर होत असल्याची तपासणी केली.

शहरात दोन दिवसांपासून पथकांकडून गॅस वितरक एजन्सींची तपासणी सुरू केली आहे. नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
- डॉ. विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com