गुन्हे वृत्त
रिक्षाचालकावर कोयत्याने वार
पिंपरी : रिक्षात बसविण्यास नकार दिल्याने दोन तरुणांनी चिंचवडमध्ये रिक्षा चालकावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी गजानन जगदेव इंगळे (रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महेश महादेव पुजारी (रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) आणि उत्कर्ष हनुमंत गुंडे (रा. घरकुल, चिखली) यांना अटक केली. आरोपींनी फिर्यादीला आनंदनगरमध्ये सोडण्यास सांगितले होते, मात्र रिक्षा चालकाने नकार दिला. पुजारीने फिर्यादीवर कोयत्याने वार केले. त्याने कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केल्याने अनेक नागरिक सैरावैरा पळाले. आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या मोबाईलमधून स्वतःच्या खात्यावर जबरदस्तीने २०० रुपये ट्रान्स्फर करून घेतले.
---------------------------
पिंपळे गुरवमध्ये तरुणाला मारहाण
पिंपरी : एका डिलिव्हरी बॉयला मारहाण होत असताना त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघांनी बेदम मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात दगड घातला. पिंपळे गुरवमधील ओमकार कॉलनी समोर हा प्रकार घडला. याप्रकरणी तनिष्क दत्तात्रय गायकवाड (रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कार्तिक चव्हाण (रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव) आणि चिराग पवन घागट (रा, बोपोडी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
-------------------------
मोशीत वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
पिंपरी : भरधाव वाहनाने धडक दिल्याने मोशीमध्ये पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. ब्रह्मा लक्ष्मण ससाणे (रा. तापकीरनगर, मोशी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी सुरेखा ब्रह्मा ससाणे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ब्रम्हा ससाणे पायी रस्ता ओलांडत होते. वाहनाच्या धडकेत त्यांच्या पाठीला, डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली.
----------------------
इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा अटकेत
पिंपरी : इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्याला पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. ही कारवाई थेरगाव फाटा येथे करण्यात आली. भैया ऊर्फ तेजस नितीन वायदंडे (रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय इंजेक्शनची विक्री करणे बेकायदा आहे. त्यानंतरही त्याने इंजेक्शन विक्रीसाठी जवळ बाळगले. पोलिसांनी त्याच्याकडून इंजेक्शनचा ६७ हजार ४५२ रुपये किमतीचा साठा जप्त केला.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

