थरमॅक्स चौकात कामगारांचे आक्रोश आंदोलन
पिंपरी, ता. १२ ः ‘कष्टकरी कामगारांचा विजय असो,’ ‘कामगार एकता झिंदाबाद, कामगारांचे अस्तित्व नष्ट करणाऱ्या चार श्रमसंहिता तत्काळ रद्द करा, कंत्राटीकरण वाढवणारे कायदे रद्द करा’...या घोषणा देत केंद्राने लागू केलेल्या चार नवीन श्रम संहिता कामगार रद्द करा, शेतकरी विरोधी धोरणे रद्द करा, वीज कंपन्यांचे खाजगीकरण रद्द, कष्टकऱ्यांना सामाजिक सुरक्षा द्या, अशा मागण्यांसाठी चिंचवड-थरमॅक्स चौकात आज (ता.१२) आंदोलन करण्यात आले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, रिक्षा टॅक्सी संघर्ष महासंघ, बांधकाम कामगार महासंघ, फेरीवाला क्रांती महासंघातर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या कामगार आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महापालिका सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, निमंत्रक सचिन नागाने, माधुरी जलमूलवार, सुनील भोसले, लाला राठोड, सखाराम केदार, रज्जाक शेख, निरंजन लोखंडे, रोहन मुरगुंड, सलीम शेख, धर्मवीर ढोपरे, विजया पाटील, जनाबाई पोमणे, कौशल्या उदके, इंदुबाई वाकचौरे, ओमप्रकाश मोरया, कल्पना गरड, केसर चव्हाण, वैशाली लहाने आदींसह पुणे जिल्ह्यातील कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते.
नखाते म्हणाले, ‘‘केंद्र सरकार इज ऑफ डूइंग बिझनेस धोरण असून, उद्योजकांना पायघड्या घालत आहे, कामगाराचे कल्याण आम्ही करत असल्याची जाहिरात करण्यात येत आहे; मात्र प्रत्यक्ष कायमस्वरूपी काम आणि नोकऱ्या संपणार आहेत. कामाचे आठ तासांवरून १२ तास करून कारखानदारांना मोकळीक देण्यात आली आहे, आता या पुढे कामगार न्यायालये नाही तर लवाद न्याय निवाडा करणार तर कसा न्याय मिळेल? कामगाराचे मूलभूत अधिकार नष्ट करण्यात येत आहे, सरकार आभासी मंडळे घोषित करते, मात्र हाती काही येत नाही.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

