संतांच्या शिकवणीतूनच समाजाची प्रगती

संतांच्या शिकवणीतूनच समाजाची प्रगती

Published on

सोमाटणे, ता. १३ : ‘‘संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, निळोबाराय महाराज यांनी समाजाला अध्यात्माचा कानमंत्र दिला. त्यामुळेच समाजात जागृती झाली. ग्रंथांनीच समाजाला दाखवला जगण्याचा मार्ग दाखवला,’’ असे प्रतिपादन चैतन्य महाराज निंबोळे यांनी केले.
महाशिवरात्री यात्रा सोहळ्यानिमित्त घोरावडेश्वर पायथा येथे घोरावडेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सवात निंबोळे महाराज बोलत होते. ‘‘संसार आणि परमार्थाची सांगड घालणे अनेकांना जमत नाही; परंतु संतांच्या विचारांचे आचरण केल्यास नक्कीच संसार आणि परमार्थ यांची सांगड घातली जाईल. समाजाला जगण्यासाठी नवी दिशा मिळण्यासाठी सर्व समाजाला संतांनी केलेल्या उपदेश आणि मार्गदर्शनाची आज गरज आहे. आज शेकडो वर्षे लोटले असतानाही संतांचे ग्रंथ अजरामर आहेत. सध्या समाज हा जुन्या विचारांवर गुरफटलेला असून त्यांनी संतांच्या ग्रंथांचे वाचन करून बारकावे आत्मसात केल्यास आपले आयुष्य सहज बदलू शकते.’’
‘‘सध्या समाज कोणाचीही आरती करू लागला आहे. यातून बोध न घेतल्यास समाज अधोगतीला जाऊ शकतो. यासाठी संतांची शिकवण महत्त्वाची आहे. आपण फक्त देव, तुळस, संत, ग्रंथ आणि तीर्थाची आरती करावी,’’ असेही आवाहन निंबोळे महाराज यांनी केले.

PNE26V95333

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com