आवडत्या लेखकांना उद्या चिंचवडमध्ये भेटा

आवडत्या लेखकांना उद्या चिंचवडमध्ये भेटा

Published on

पिंपरी, ता. १३ ः क्रॉसवर्ड बुक स्टोअर आणि ‘सकाळ’ प्रकाशन यांच्यातर्फे रविवारी (ता. १५) चिंचवडमधील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल येथे लेखक- वाचक भेट आणि स्वाक्षरी उपक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी प्रख्यात लेखिका व अनुवादक मुक्ता चैतन्य सायंकाळी पाच वाजता आणि योगतज्ज्ञ मनोज पटवर्धन सायंकाळी सहा वाजता वाचकांशी संवाद साधतील.
मुक्ता चैतन्य लिखित ‘सायबर पालकत्व भाग १ व २’ आणि मनोज पटवर्धन लिखित ‘ध्यानस्वास्थ्य’ ही पुस्तके ‘सकाळ’ प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांवर संबंधित लेखकांची स्वाक्षरी वाचक घेऊ शकतील. बाल, युवा व प्रौढ अशा सर्व वयोगटांना दर्जेदार वाचनाकडे वळवण्यासाठी क्रॉसवर्ड बुक फेस्ट आयोजित केला जातो. या उपक्रमात वाचकांना आपल्या आवडत्या लेखकाला पाहण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांनी लिहिलेल्या ‘सकाळ’ प्रकाशित पुस्तकावर स्वाक्षरी घेण्याची संधी मिळते. या उपक्रमाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. या संधीचा रसिकांनी जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सकाळ’ प्रकाशनाने केले आहे.

काय आहे पुस्तकांत
- डिजिटल युगात मुलांवर स्क्रीनचा होणारा वाढता प्रभाव लक्षात घेऊन पालकांनी सजग आणि सक्षम होण्याची गरज आहे, हे सांगणारी ‘सायबर पालकत्व भाग १ व २’ ही पुस्तके काळाची गरज आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य मार्गदर्शन, जागरूकता आणि समतोल साधण्याचा प्रयत्न या पुस्तकांत केला आहे.
- योगतज्ज्ञ मनोज पटवर्धन लिखित ‘ध्यानस्वास्थ्य’ या पुस्तकात ध्यान, योगनिद्रा आणि योगशास्त्र यांचा वैज्ञानिक, वैद्यकीय आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून उलगडा केला आहे. सोप्या भाषेत ध्यानाचा खरा अर्थ सांगणारे हे पुस्तक आहे.

पुस्तक स्वाक्षरी उपक्रम
एक
पुस्तक ः सायबर पालकत्व भाग १ व २
लेखिका : मुक्ता चैतन्य
वेळ व वार ः रविवार, १५ फेब्रुवारी, सायंकाळी ५ वा.
स्थळ ः क्रॉसवर्ड बुक फेस्ट, एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल, चिंचवड

दोन
पुस्तक ः ध्यानस्वास्थ्य
लेखक ः मनोज पटवर्धन
वेळ व वार ः रविवार, १५ फेब्रुवारी, सायंकाळी ६ वा.
स्थळ ः क्रॉसवर्ड बुक फेस्ट, एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल, चिंचवड
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com