गंगा आरती, गंगाकलश स्नान निगडी प्राधिकरणात संपन्न
पिंपरी, ता. १६ ः महाशिवरात्रीनिमित्त निगडी प्राधिकरणातील श्री केदारेश्वर मंदिर प्रांगणात गंगा आरती आणि गंगाकलश स्नान शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाले. यावेळी विधानपरिषद उपसभापती अण्णा बनसोडे, नगरसेविका शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे, श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
काशी विश्वेश्वर येथील विद्वान पंडित हिमांशू पांडे आणि गगन भार्गव यांच्या पौराहित्याखाली रविवारी (ता.१५) सायंकाळी ७:१५ वाजता गंगाआरती आणि रात्री ८ वाजता गंगाकलश स्नान पार पडले. यावेळी शंखनाद, घंटानादात श्रीगणेश पूजन, शिवस्तुती, शिवस्तवन आणि धूप, दीप, कर्पूर आरतीने श्री केदारेश्वराची आरती करण्यात आली. भाविकांनी पुष्पवृष्टी करीत देवाधिकांचा जयघोष केला. महाशिवरात्री २०२६ महोत्सवात रविवार (ता. १५) पहाटे पाच वाजल्यापासून सोमवारी (ता. १६) पहाटे पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे रुद्राभिषेक पार पडला. सकाळी ७.३० वा. बागलकोट कृष्णशिला इच्छाधारी नागधाम प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर फळ जलअभिषेक, आरती, रक्तदान शिबिर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. पवनसुत भजनी मंडळ, स्वामी प्रतिष्ठान भजनी मंडळ यांनी भजन सेवा सादर केली. सायंकाळी युद्धकला प्रशिक्षणाअंतर्गत लाठीकाठी आणि दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. कलारंजनी संगीत विद्यालयाच्या वतीने ‘सत्यम् शिवम् सुंदरा’ हा भावगीतांचा कार्यक्रम पार पडला. रात्री स्थानिक कलाकारांनी भक्ती संगीतमाला सादर केली. रात्री ११ पासून पहाटे पाच वाजेपर्यंत महाशिवरात्र जागरण करण्यात आले. चार प्रहर पूजेने महाशिवरात्री महोत्सवाचा समारोप करण्यात आला. या सर्व धार्मिक कार्यक्रमांत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

