उर्से येथे बसथांब्याअभावी प्रवाशांचा जीव धोक्यात
सोमाटणे, ता. १७ ः अधिकृत बसथांबा, निवारा शेड आणि बस थांबण्याची शास्वती नसल्याने महिलांवर रस्त्यावर उभे राहून वाहनाची प्रतिक्षा करवी लागत आहे.
उर्से येथील टोल नाक्यावर टोल भरताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मागील सहा महिन्यापुर्वी उर्से टोलनाक्याचे स्थलांतर मुंबई महामार्गाच्या बाजूस करण्यात आले. या टोलनाक्याच्या स्थलांतराबरोबर येथे कार्यरत असलेल्या महामार्ग पोलिसांसह सर्व कर्मचारी संरक्षण यंत्रणाही नवीन टोलनाक्यावर हलविण्यात आली. परिणामी सध्या जुना टोलनाका परिसरात प्रवाशांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर उभे राहून वाहनाची वाट पहावी लागत आहे. येथे रस्त्याला उतार असल्याने वाहने वेगाने जातात त्यामुळे रस्त्यात उभे राहणाऱ्या प्रवाशांना वाहन मिळेल की नाही याची शक्यता नसते. प्रसंगी वेळेवर बस न मिळाल्यास मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो. यातून अपघात होण्याचा धोका अधिक असल्याने उर्से येथे पुणे बाजूकडे जाणाऱ्या बसला थांबा द्यावा व रस्त्यालगत निवारा शेड बांधावा अशी मागणी सुभाष धामणकर यांनी केली आहे.
PNE26V96373
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

