विद्यार्थ्यांना मिळाला मानवी मूल्यांचा संदेश

विद्यार्थ्यांना मिळाला मानवी मूल्यांचा संदेश

Published on

पिंपरी,ता. १७ ः संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघ पिंपरी चिंचवड यांच्या १६ व्या वर्धापन दिन नुकताच उत्साहात पार पडला. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभाग आणि सिटी प्राइड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निगडीतील सिटी प्राइड ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना ‘भारतीय संस्कृती व जीवन मूल्ये’ ही होती.
या प्रसंगी आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शनपर भाषणात भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये, नैतिक मूल्यांचे महत्त्व आणि आधुनिक काळातील तरुण पिढीसमोरील आव्हाने यावर प्रकाश टाकला. यावेळी ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे म्हणाले की, भारतीय संस्कृती ही त्यागावर आणि मानवी मूल्यांवर आधारित आहे. वैज्ञानिक कालखंडात आपल्या संस्कृती परंपरेला विसरून चालणार नाही.
स्वागत रविकांत कळंबकर व शिवानंद चौगुले यांनी केले. प्रास्ताविक डॉ. अजित जगताप यांनी केले. सूत्रसंचालन पूजा गवांदे यांनी तर आभारप्रदर्शन किसन महाराज चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन शिवानंद चौगुले, सुभाष चव्हाण, विकास देशपांडे, चंद्रशेखर जोशी, उज्ज्वला केळकर यांच्यासोबत सिटी प्राईड कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केले.

Marathi News Esakal
www.esakal.com