महापालिका स्वीकृत सदस्यपदी 
निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी

महापालिका स्वीकृत सदस्यपदी निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी

Published on

पिंपरी, ता. १९ ः महापालिकेत स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया सुरू आहे. या पदावर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी. महापालिका निवडणुकीत ज्यांना तिकीट दिले, पण पराभूत झाले त्यांच्यासह त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना संधी देऊ नये. यामध्ये आई-वडील, भाऊ-बहीण, पती किंवा पत्नी, मुलगा, मुलगी यांपैकी कोणालाही संधी देऊ नये. तसेच, माजी नगरसेवक, शासकीय पदे उपभोगलेले, अन्य पक्षांतून आपल्या पक्षात आलेले किंवा अन्य समित्यांवर पद उपभोगलेल्यांऐवजी निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्विकृतपदी संधी द्यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष कार्यकारिणी सदस्य, प्रकाश जवळकर, देवदत्त लांडे, नानासाहेब डवरी, सुरेश गादिया, बापूसाहेब भोसले, रंजना पाटील, संजय गोडसे, अमित जवळकर आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com