मराठी भाषा संवर्धन समिती कामाकाजाला गती द्या

मराठी भाषा संवर्धन समिती कामाकाजाला गती द्या

Published on

पिंपरी, ता. २० ः शहरात मराठी साहित्य क्षेत्राला गती मिळावी, मराठीचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन समितीची २०१६ ला स्थापना करण्यात आली. गेल्या दहा वर्षांत या समितीच्या केवळ चार ते पाच बैठका झाल्या. या बैठकांत साहित्यिकांनी अनेक ठराव मांडले होते. मात्र, या ठरावांबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्याने गेल्या चार वर्षे शहरात कोणीही नगरसेवक नव्हते. मात्र, निवडणुकांनंतर महापालिकेवर निवडून गेलेल्यांनी लोकप्रतिनिधींनी याची दखल घ्यावी, अशी मागणी साहित्य क्षेत्रातून पुढे येत आहे.

साहित्यिकांच्या मागण्या
- मराठी भाषा संवर्धन समितीची नवीन समिती स्थापन करून सभा घेणे
- शहरातील साहित्यिकांच्या प्रकाशित साहित्याच्या प्रत्येकी १०० प्रति महापालिकेने खरेदी कराव्यात किंवा लेखक व कवीला १५ हजाराचे मानधन द्यावे
- साहित्यिकांच्या विविध कार्यक्रमांसाठी सुसज्ज सभागृह देण्यात यावे
- अमराठी भाषिकांना मराठीचे धडे द्यावेत
- स्थानिक कलाकारांना घेऊन दरवर्षी एक साहित्य संमेलन घ्यावे

‘गेली नऊ ते दहा वर्ष शहरातील नवोदित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल साहित्यिकांना काही आर्थिक मदत मिळावी, यासाठी मी महापालिकेसोबत पत्रव्यवहार करीत आलो आहे. मी मराठी भाषा संवर्धन समितीवर होतो, तेव्हाही याबाबत अनेक ठराव मांडले होते. मात्र, त्याविषयाची दखल घेण्यात आली नाही. आता पुन्हा एकदा महापालिकेवर नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांनाही मी पत्रव्यवहार केला आहे.
- राज आहेरराव, अध्यक्ष, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ

साहित्यिकांच्या मागण्या महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. महापौरांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच क्रीडा कला सांस्कृतिक समिती स्थानप होऊन समितीवरील सदस्यांची निवड होईल. शहराची सांस्कृतिक आणि मराठी भाषा संवर्धन चळवळ पुढे नेण्यासाठी या समितीच्या मार्फतच भविष्यात निर्णय घेतले जातील.’
- किरण गायकवाड, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com