शिवजयंती उत्साहात साजरी (फोटो फिचर)
शिवजयंती उत्साहात साजरी (फोटो फिचर)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा १९ फेब्रुवारी हा दिवस जन्मदिवस म्हणजेच त्यांची जयंती. त्यानिमित्ताने शहरात भगवे वातावरण दिसून आले. शिवप्रेमींनी भगवे ध्वज हातात घेऊन, भगव्या रंगाचे फेटे बांधून, टोप्या परिधान करून भक्ती-शक्ती, निगडी येथे शिवरायांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सर्वांनी ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या. शिवरायांबद्दलचे प्रेम, आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण त्यांच्या मिरवणुकीत तसेच दर्शनासाठी गर्दी करताना दिसत होते. अनेक लहान मुलांनी शिवरायांच्या तसेच लहान मुलींनी जिजाबाईंची काहींनी मावळ्यांची वेशभूषा केलेली दिसत होती. आकुर्डीतील समर्थ युवक प्रतिष्ठानने हातात भगवे ध्वज व फेटे घालून चार चाकी व दुचाकी वरून रॅली काढली. संभाजीनगर येथील छावा ग्रुपच्या महिलांनी शिवरायांची प्रतिमा व हातात भगवे ध्वज घेऊन ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या. रहाटणी शिवस्मारकावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पिंपरीगाव येथे लहान मुली पारंपरिक वेशभूषेत छान नटून आल्या होत्या. एकूणच शहराचे वातावरण भगवे झालेले आढळून आले. त्याचीच ही चित्रमय झलक.
(संतोष हांडे व रितेश छपरीबंद : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

