महावितरणकडून ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय सोलार’ योजना
पिंपरी, ता. १९ ः दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय सोलार’ योजना राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून महावितरण उपविभाग खराळवाडी तर्फे गणेशनगर दापोडी व जगन्नाथ इन्फ्रा सोसायटी खराळवाडी येथे शिबिर घेण्यात आले.
या योजनेत एक किलोवॅटचे सोलार सबसिडीवर देण्यात येणार आहे. एक किलोवॅट सोलारला पन्नास हजर रुपये खर्च येतो. परंतु बीपीएल ग्राहकास सदर सोलार जोडणी २५०० रुपये खर्च व सबसिडी ४७,५०० रूपये, सर्वसाधारण गट माहे १०० युनिट्स पेक्षा कमी वापर यांना १०००० रुपये खर्च व ४०००० रुपये सबसिडी, अनुसूचित जाती व जमाती गट माहे १०० युनिट्स पेक्षा कमी वापर यांना ५००० रुपये खर्च व ४५००० रुपये सबसिडी, अशी सोलार योजना आहे. कार्यक्रमास खराळवाडी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भुजंग बाबर, खराळवाडी शाखेचे साहाय्यक अभियंता राहुल पालके, इंद्रजित खराबस, ज्ञानेश्वर साळुंके, गणेश चव्हाण व लाभार्थी ग्राहक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

