सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

बेशिस्तपणे वाहने उभी केल्याने अडथळा

चिंचवड लिंक रस्त्यावर ऑर्किड शाळेजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावलेली असतात. त्यामुळे येथून ये-जा करताना वाहनचालकांना याचा अडथळा होत आहे. तसेच रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहतूक कोंडी होते. महापालिकेच्या संबंधित विभागाने या परिसराची पाहणी करून येथे लावल्या जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी.

- शैलेश शिरसाट, चिंचवड

रस्त्यावर साचले कचऱ्याचे ढीग
वाकड येथील दत्त मंदिर रस्त्यावरून भुजबळ पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पदपथावर मागील अनेक दिवसांपासून कचरा साचला आहे. हा कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच कचरा व इतर राडारोडा साचल्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालण्यास अडचणी येत आहेत.त्यामुळे संबंधित विभागाने या परिसरातील कचरा उचलून स्वच्छता करावी.

- एक नागरिक, वाकड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com