डिजिटल व्यवहार करताय सावधान!

डिजिटल व्यवहार करताय सावधान!

Published on

पिंपरी, ता. २० : डिजिटल व्यवहार करण्यासाठी यूपीआय अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, याच वाढत्या वापराचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार डाव साधत आहेत. अज्ञान, घाईगडबड किंवा तांत्रिक माहितीअभावी अनेक नागरिक, व्यापारी पैसे गमावत आहेत.

फसवणुकीचे प्रमुख प्रकार
फेक पेमेंट स्क्रीनशॉट
- ऑनलाइन वस्तू खरेदी-विक्री करताना फसवणूक करणारे ‘पेमेंट झाले’ असा बनावट स्क्रीनशॉट पाठवतात. विक्रेत्याने प्रत्यक्ष खात्यात पैसे आले आहेत का? हे न पाहता वस्तू दिल्यास नुकसान होते.
- ‘तुम्हाला कॅशबॅक मिळाला आहे,’ ‘रिवॉर्ड जिंकला आहे,’ असे संदेश पाठवून लिंकवर क्लिक करायला सांगितले जाते. पुढे पिन/ओटीपी मागवून पैसे काढले जातात.
- बँक किंवा यूपीआय अ‍ॅपच्या नावाने फोन करून ‘तुमचे खाते बंद होईल’ असे सांगितले जाते. घाबरलेल्या ग्राहकांकडून पिन किंवा ओटीपी घेतला जातो.
- काही अ‍ॅप्स डाऊनलोड करायला सांगून मोबाईलवर नियंत्रण मिळवले जाते आणि खाते रिकामे केले जाते.

फसवणूक कशी ओळखावी?
- पैसे घेण्यासाठी कधीही पिन लागत नाही, हे लक्षात ठेवा.
- पिन टाकणे म्हणजे पैसे पाठवणे.
- घाई करायला लावणारे, धमकी देणारे कॉल संशयास्पद असतात.

काय काळजी घ्यावी?
- व्यवहाराची खात्री करा
- स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवू नका. अ‍ॅपमधील ट्रान्झॅक्शन इतिहास तपासा.
- पिन आणि ओटीपी गुप्त ठेवा.
- कुटुंबियांशिवाय कुणालाही पिन सांगू नका.
- अधिकृत अ‍ॅपचाच वापर करा.
- अनोळखी मेसेज किंवा ई-मेलमधील लिंक उघडू नका.

येथे तक्रार करावी.
फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क करा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

काही घटना
- देहूतील एका औषध विक्रीच्या दुकानात औषधे खरेदीच्या बहाण्याने आलेल्या एका व्यक्तीने खरेदीनंतर पेमेंट झाल्याचा बनावट स्क्रीनशॉट दुकानदाराला दाखविला. मात्र, सतर्क असलेल्या दुकानदाराने व्यवस्थित पडताळणी केली असता पेमेंट न झाल्याचे समोर आले.
- निगडीत एका कॅबचालकाला गंडा घातला. प्रवाशाने गाडीतून उतरताना भाड्याचे पैसे पाठविल्याचा स्क्रीनशॉट दाखविला. मात्र, प्रत्यक्षात, पैसे पोहोचलेच नाही.

‘‘खोटे स्क्रीनशॉट दाखवून अथवा टेक्स्ट मेसेजद्वारे पैसे पाठविल्याचे भासविले जाते. मात्र, प्रत्यक्षात पैसे पाठवलेले नसतात. अशा अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे. पूर्ण खात्री झाल्याशिवाय कोणत्याही प्रक्रियेवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
- प्रवीण स्वामी, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी चिंचवड
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com