विविध शाळांमध्ये शिवजयंती साजरी

विविध शाळांमध्ये शिवजयंती साजरी

Published on

पिंपरी, ता. २१ ः शहरातील विविध शाळांमध्‍ये वेगवेगळ्या उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्‍यात आली.
मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत मुख्याध्यापक पांडुरंग मराडे, पालक संघाच्या उपाध्यक्षा शारदा हागे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा पूनम वाघ यांनी पूजन केले. राजवीर निंबाळकर व शिवराज अमृळे बाल शिवबाच्या वेशभूषेत आले होते. ज्येष्ठ शिक्षिका सुजाता कुलकर्णी यांनी गीत सादर केले. अन्वी डिगे , साईराज सावकार, श्रेया गटकळ या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांची माहिती दिली. चौथीच्या विद्यार्थ्यांनी कैलास माळी दिग्दर्शित ''गड आला पण सिंह गेला'' हे नाट्य सादर केले. अक्षता भिसे, सिमर सुरवसे व आयुष कुंभार यांनी पोवाडा सादर केला. अपर्णा घोलप यांनी सूत्रसंचालन केले.

श्री बांठिया जैन विद्यामंदिर
श्री बांठीया प्राथमिक जैन विद्यामंदिर शाळेच्या मैदानावर चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सव म्हणजेच (झुलवा पाळणा) या गीतावर सुंदर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांचे लाठीकाठी प्रात्यक्षिक आकर्षण ठरले. मुख्याध्यापिका सुवर्णा मुसळे, एस .ए. मगदूम, पी. आर. दुसाने यावेळी उपस्थित होते. शाळेचे विभागप्रमुख व्ही. बी. फंड यांनी आभार मानले.

अरविंद एज्युकेशन सोसायटी
लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी ढोल-ताशाच्या गजरात शिवगर्जना केली. यावेळी अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, प्राचार्य शीतल मोरे, मुख्याध्यापिका आशा घोरपडे, नीलम पवार, इशिता परमार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, सीमा हवालदार, प्रीती पाटील उपस्थित होते.

सरस्वती विद्यालय
आकुर्डी येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांनी जयंती साजरी केली. वर्गशिक्षिका प्रतिमा काळे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत चव्हाण, कैलास कोशिरे यांनी तर विद्यार्थ्यांनी पोवाडा, मनोगते,शिवगीत गायन व शिवगीतावर नृत्य सादर केले.राजरत्न कांबळे,अभिराज गवारे,गौरव अडागळे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे चित्र काढून रंगवले.

जयवंत प्राथमिक शाळा
जयवंत प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संध्या भावे, मुख्याध्यापिका वंदना सावंत यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले. सहावीतील प्रतिक साळवेने शिवाजी महाराजांची, तर तिसरीतील ऐश्वर्या सुरवसेने राजमाता जिजाऊ यांची वेषभूषा केली होती. वंदना कोरपे यांनी संयोजन केले.


एच. ए. स्कूल
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेच्या (एच. ए. स्कूल) मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून पहिलीचा विद्यार्थी मौर्य पाटील शिवरायांच्या, तर स्वरा गजरे जिजाबाईंच्या वेषभूषेत आले होते. समर्थ आव्हाडने पोवाडा सादर केला. पूर्व प्राथमिकच्या यज्ञेश देवलकरने शिवगर्जना दिली. पुष्पा राऊत यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले.

मॉडर्न हायस्कूल
निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये शिवचरित्रावर आधारीत अनेक प्रसंगातून प्राचार्य प्रकाश पाबळे यांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले. नवेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजय पाचारणे यांनी आभार मानले. शिक्षिका आशा कुंजीर, सविता नाईकरे, मीना अधिकारी, शिवाजी अंबिके यांनी नियोजन केले.


निंबारकर विद्यालय
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या, मातोश्री ताराबाई भिमाजी निंबारकर पूर्व प्राथमिक विद्यालय, सौ जयश्री दिलीप निंबारकर प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालयात अनन्या काळबांडे या दुसरीतील विद्यार्थिनीने शिवगर्जना सादर केली. यावेळी अंकिता नगरकर-देगील, संस्थेच्या अध्यक्षा जयश्री निंबारकर उपस्थित होत्या. उपशिक्षक गजानन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्र सांगितले. धनंजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांना गणेश वाळुंज, हनुमंत जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक आयुष्य निंबारकर, मुख्याध्यापिका स्नेहल पारखे यांनी नियोजन केले.


श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर
श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर येथे शिवजयंती निमित्त बालचमूने शिवजन्मोत्सव साजरा केला. आम्ही मराठे नृत्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी संस्कृतीचे जतन केले. मुख्याध्यापिका वर्षा काटकर यांनी प्रास्ताविक केले. रेश्मा शेवकरी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन रवींद्र गारगोटे, शोभा पंगुडवाले, शुभदा इंदुरे, नंदा कातकडे यांनी केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com