सुरेखा कटारिया यांना जीवनगौरव पुरस्कार
पिंपरी, ता. २१ ः साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्राध्यापक सुरेखा कटारिया यांना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इन्स्टिट्यूट्सच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त बाणेर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात कटारिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश उदय ललित, आचार्य चंदन महारा, अभिनेते अशोक सराफ यांची यांच्यासोबतच शिक्षण, प्रशासन, कला आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपप्राचार्य सुरेखा कटारिया यांनी साहित्य क्षेत्रासोबतच सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातही सातत्याने सेवा केली आहे. पिंपरीतील भारतीय जैन संघटना विद्यालयातून उपप्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यानंतर प्रा. कटारिया यांनी श्री आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केली. त्यांनी अखिल भारतीय महिला साहित्य आणि कला परिषदेचे आयोजन केले. या कार्यासाठी त्यांना गौरविण्यात आले.
सूर्यदत्ता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांनी प्रा. सुरेखा कटारिया यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांचा सन्मान केला. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे प्रमुख भाषण कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

