सोनसाखळ्या चोरणाऱ्या
दोन सराइतांना अटक

सोनसाखळ्या चोरणाऱ्या दोन सराइतांना अटक

Published on

पिंपरी, ता. २० : पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकाविणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सोन्याच्या चार लाख दहा हजार रुपये किमतीच्या दागिन्यांसह एकूण पाच लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
गणेश भारत गिरी (रा. बीड), सुमीत सोपान चव्हाण (रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी आरोपींची नावे आहेत. पिंपरी आणि दिघी येथे आठ फेब्रुवारीला सोनसाखळी हिसकावण्याचे दोन प्रकार घडले होते. याचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करीत होते. सुमारे अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.
या चोऱ्या गिरीने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दागिने आणि दीड लाख रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. त्याने पिंपरी, दिघी, निगडी आणि चिखली परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली.
पिंपरी आणि दिघीत येथे गणेशने साथीदार रोहन जाधवसह गुन्हे केले. निगडीतील गुन्हा गणेश दिवटेसह, तर चिखलीत सुमीत चव्हाण आणि ओमकार रामेश्वर लाटे (रा. नगर रोड, बीड) यांच्या साथीत केल्याचे सांगितले. त्यातील सुमीत चव्हाणला अटक करून चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गणेशवर बीड मधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार, तर अंबाजोगाई तसेच पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com