पिंपरी जीबी जोड
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले...
- चार वर्षांच्या खंडानंतर लोकशाही पद्धतीने काम सुरू झाल्याची झलक आज दिसून आली
- महापालिकेने शहर विकसित केले आहे, त्यासाठी अनेकांचा हातभार लागला आहे
- भटक्या कुत्र्यांचा प्रश्न प्रामुख्याने मांडला गेला, त्यातील कुत्र्यांचे संतती नियमन, रेबिज प्रतिबंधक, शेल्टर उभारणे, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचा आदेश प्रशासनाला देत आहे
- पाणी कोटा पाहिजे तेवढा शहराला मिळालेला नाही. भामा आसखेड पाणी योजना व रखडलेले अन्य प्रकल्प पूर्ण करण्याचे व समन्याय पद्धतीने पाणीवितरण करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली जाईल
- पाणी कोटा वाढवण्यासाठी पाइप लाइन योजना, पुनर्वापर, मागील बंधाऱ्यातून घेता येईल का याची पडताळणी केली जाईल
- अवजड वाहनांच्या धोरणाबाबत पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊ
- स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामे लवकरात लवकर महापालिकेच्या संबंधित विभागांकडे वर्ग करून कार्यवाही केली जाईल
- मेट्रोच्या कामामुळे खराब झालेला रस्ता दुरुस्त केला जाईल
- मिळकतकराबाबत अभय योजना लागू करण्याबाबत विचार केला जाईल. नवीन धोरणानुसार जास्तीत जास्त किती वर्षे मागे जाऊन बांधकामांना कर आकारणी होईल
- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे शहरासाठीचे योगदान आणि त्याबाबत केल्या गेलेल्या सूचनांचा विचार होईल
- प्रशासन सजग, लोकाभिमुख राहील, यासाठी आयुक्त म्हणून मी कटिबद्ध आहे
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

