शहरात आज शिष्यवृती परीक्षा
पिंपरी, ता. २१ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृती परीक्षा रविवारी (ता. २२) होत आहे. या परीक्षेला महापालिका, खासगी, अनुदानीत, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहायीत अशा सर्व प्रकारच्या शाळांमधील दोन्ही इयत्तांचे एकूण १५ हजार ५०७ विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांतून परीक्षा होईल.
एकूण २७० शाळांनी विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली आहे. परीक्षेसाठी दोन पेपर आहेत. विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. राज्य, जिल्हा अथवा तालुका स्तरावर गुणवत्ता यादीत आलेल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना वर्षाला पाच हजार, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना ७५०० रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अशी होईल परीक्षा
पहिला पेपर प्रथम भाषा व गणित असून तो सकाळी ११ ते १२.३० या वेळेत होईल. दुसरा पेपर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी दुपारी २ ते ३.३० या वेळात होईल. दोन्ही पेपर देणे अनिवार्य आहे. प्रत्येक पेपरमध्ये ७५ प्रश्न असून बहुपर्यायी उत्तरामधून योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवायचे आहे. वर्तुळ रंगविण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचाच वापर करावयाचा आहे. जेल पेन, शाई पेन, पेन्सिलचा वापर करू नये. प्रत्येक प्रश्नांच्या योग्य उत्तराला दोन गुण आहेत. परिक्षेस पात्र होण्यासाठी किमान ४० टक्के गुण (१५० पैकी ६०) मिळविणे आवश्यक आहे. मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमांसाठी प्रश्नपत्रिका बहुसंची (एबीसीडी) पद्धतीने देण्यात येईल. हिंदी माध्यमाकरिता प्रश्नपत्रिका केवळ ‘ए’ संचामध्ये देण्यात येईल. उत्तरपत्रिकांची तपासणी ओएमआर पद्धतीने संगणकावर होणार असल्याने विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका काळजीपूर्वक हाताळाव्यात, अशी सूचना परीक्षा परिषदेने दिल्या आहेत.
आकडे बोलतात
इयत्ता - केंद्र - विद्यार्थी संख्या
- पाचवी - ४४ - ९ हजार ५४२
- आठवी - ३० - ५ हजार ९६५
केंद्र संचालक - ७४
सह केंद्रसंचालक - १२
पर्यवेक्षक - ७६५
शिपाई - १९९
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

