काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी देशविरोधी

काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी देशविरोधी

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २१ ः ‘दिल्लीत जागतिक एआय परिषद सुरु असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आपला पक्ष आणि राहुल गांधी देशविरोधी असल्याचे काल जगाला दाखवून दिले. राहुल गांधी लोकसभेचे सदस्य तसेच विरोधीपक्ष नेते आहेत. ते जी काही भूमिका मांडायची ती लोकसभेत मांडू शकतात, पण त्यांनी परिषदेच्या ठिकाणी काही लोकांना पाठवून देशाची प्रतिमा मलिन केली,’ अशी टीका उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. २१) चिंचवडमधील पत्रकार परिषदेत केली. कालच्या प्रकाराबद्दल काँग्रेस नेतृत्वाने माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
ते म्हणाले की, ‘देश-विदेशातील तज्ज्ञ या परिषदेसाठी दिल्लीमध्ये आलेले असताना काँग्रेसचे कार्यकर्ते आतमध्ये जाऊन आपले कपडे फाडून आंदोलन करतात. त्यांना कपडे काढण्याची आवश्‍यकता राहिलेली नाही. देशातील जनतेने मतदान करून काँग्रेसचे कपडे उतरवले आहेत. राजकारणातील तसेच निवडणुकीतील विरोध मी समजू शकतो. पण, हे देशाचा अपमान करणारे आंदोलन होते. राहुल गांधी यांनी अनेक वेळा परदेशात मुलाखती, भाषणे देतानाही देशाची प्रतिमा मलिन केली. हा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नव्हे तर करून देशवासीयांचा अपमान आहे.’

विकास कामे थांबत नाहीत
‘विरोधी पक्षनेता नसल्यामुळे कुठेही विकास कामांवर परिणाम झालेला नाही. विधानसभेत आणि विधानपरिषदेत विरोधीपक्षनेता पद देण्याचे अधिकार विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेच्या अध्यक्षांना आहेत. ते योग्य वेळी निर्णय घेतील. विरोधी पक्षनेता नसल्यामुळे महाराष्ट्र थांबलाय, असे कुठेही झालेले नाही. देशातही मागच्या पाच वर्षात विरोधीपक्ष नेता नव्हता. त्यावेळी केंद्र शासनाने चांगली कामे केली आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात सहकार्य करणारे विरोधक पाहिजेत. राज्याची आणि देशाची प्रतिमा मलिन करणारे विरोधक नकोत,’ असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला.

राज्यसभेसाठी वेगळे मतप्रवाह
‘शिवसेनेचे युवा प्रमुख राज्यसभेचा उमेदवार शिवसेनेचा असेल. असे सांगतात. काँग्रेसलाही शिवसेनेचा उमेदवार असावा हे मान्य आहे. पण, रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी मात्र शरद पवारांचे नाव घेतले. खरं तर; आधी त्यांनी स्वतःच्या पक्षात समन्वय साधायला हवा. मग; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काय करावे हे सल्ले द्यावेत,’ असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com