फेरीवाला कायद्याला गती देऊ

फेरीवाला कायद्याला गती देऊ

Published on

पिंपरी, ता. २२ : पिंपरी चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, स्टॉल धारकांच्या विविध प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व समिती सदस्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावर फेरीवाल्यांचे प्रश्न सोडविण्यासह बैठकीचे आयोजन करून लवकरच फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करू, असे आश्वासन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी (ता. २१) पथविक्रेता समिती सदस्य व महासंघाचे पदाधिकारी यांना दिले.
महापालिका क्षेत्रात २०२२ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले असून, यामध्ये अनेक विक्रेत्यांनी प्रमाणपत्र शुल्क चौदाशे रुपये भरलेले आहे. त्यांना फेरीवाला प्रमाणपत्र दिले जात नाही ते त्वरित द्यावे, हॉकर्स झोनच्या जागांच्या निश्चितीसाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर बैठक आयोजित करावी. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश देवून जागा निश्चिती करणे गरजेचे आहे, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली.
दरम्यान, आयुक्त म्हणाले, ‘लवकरच आपण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समितीची बैठक घेऊन योग्य नियोजन करू.’
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, अलका रोकडे, किसन भोसले, राजेश माने, इरफान चौधरी, बालाजी लोखंडे आदी उपस्थित होते.
---
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com