मोशीमध्ये कंटेनरची पाच मोटारींना धडक; एक जखमी
पिंपरी, ता. २१ : भरधाव कंटेनरने रस्त्यालगत उभ्या असलेल्या पाच मोटारींना धडक दिली. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला. मोशीमध्ये शुक्रवारी (ता. २०) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. कंटेनर मोशी उपबाजार समिती रस्ता ते चिखली रस्ता या मार्गाने जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर धडकला. चार मोटारींत कोणीही नव्हते. एका मोटारीत चालक होता. तो किरकोळ जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी कंटेनर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

