एसटी सेवानिवृत्त संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीराम गालेवाड
पिंपरी, ता. २२ ः राज्य मार्ग परिवहन सेवानिवृत्त संघटनेची पुणे विभागीय कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. अध्यक्षपदी श्रीराम गालेवाड व सचिवपदी रमेश शिंदे यांची नियुक्ती झाली. राज्य सरचिटणीस सदानंद विचारे यांनी नुतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. नव्या कार्यकारिणीत हरिदास अडसूळ (कार्याध्यक्ष), महेश नागपुरे, संजय वावळे (उपाध्यक्ष), बी. के. गायगवारे (सहसचिव), राणबा ढावरे (कोषाध्यक्ष), हमीदखान पठाण (संघटक सचिव), अरविंद ब्रम्हे (प्रसिद्धी प्रमुख) यांचा समावेश असेल. तसेच आगार सचिव म्हणून किशोर कुचेकर (सासवड), पी. बी. सणस (भोर), राजेन्द्र सोनवणे (नारायणगाव), श्याम मोरजकर (दापोडी, भोसरी) यांची निवड झाली आहे. २०२६ ते २०२९ असा कार्यकारिणीचा कार्यकाळ असेल.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

