सुसंवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ तत्‍त्वाचा मूलमंत्र ः डॉ. संजय उपाध्ये

सुसंवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ तत्‍त्वाचा मूलमंत्र ः डॉ. संजय उपाध्ये

Published on

पिंपरी, ता. २३ ः ‘सुसंवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचा मूलमंत्र आहे.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. गांधी पेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न’ या मासिक प्रवचन मालिकेत ‘विचार करूनच बोला!’ या विषयावर डॉ. उपाध्ये यांनी निरूपण केले. चिंचवडगावातील काशीधाम मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या प्रवचनाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक राहुल कलाटे, शेखर चिंचवडे, नगरसेविका मनीषा चिंचवडे आणि मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची उपस्थिती होती.
ज्ञानेश्वर माऊलींनी ‘बोल ते जे अर्णव पीयूषाचे...’ असे वर्णन केल्याप्रमाणे आपले बोलणे हवे. अर्थातच ज्याला ज्या भाषेत कळते त्याच भाषेत बोलल्यावरच माऊलींचे ‘विश्व स्वधर्म सूर्य पाहो!’ हे हिंदु धर्माबाबतचे स्वप्न पूर्णत्वास जाईल, असे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले. गोलांडे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. विपुल नेवाळे, ॲड. मोरेश्वर शेडगे, अवधूत कुलकर्णी, महेश गावडे, अनिरुद्ध येवले, बापू मिरजकर, सिद्धी नेवाळे, सुजाता पोफळे आदींचे सहकार्य लाभले. सुहास पोफळे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com