शालेय जगत
शालेय जगत
के. जे. चावला प्रशाला
नवनिर्माण मंडळ संचलित के. जे. चावला प्राथमिक शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. यात इयत्ता पहिली ते चौथी व बालवर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष निर्मल अर्जुन चौहान यांनी मार्गदर्शन केले. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करता येतो. यावेळी धावणे, लिंबू चमचा, डोक्यावर पुस्तक घेऊन चालणे, तीन पायांची शर्यत, संगीत खुर्ची असे खेळ घेण्यात आले. प्रत्येक खेळातून पहिले तीन क्रमांक काढण्यात आले. मुख्याध्यापिका स्वाती भांडवलकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. नरसिंग ढावारे यांनी तिसरीतील मुलांना मार्गदर्शन केले. क्रीडा विभाग प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर कंठाळी, तर पंच म्हणून सुधीर महानोर यांनी काम पाहिले.
अभिषेक इंटरनॅशनल
मोशी येथील अभिषेक इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती भक्तिभावाने साजरी झाली. या निमित्ताने विद्यार्थ्यांना शौर्य, नेतृत्वगुण आणि देशप्रेमाच्या आदर्शांची ओळख करून देण्यात आली. प्रारंभी व्यवस्थापन सदस्य आणि शाळेच्या प्राचार्यांचे स्वागत झाले. त्यानंतर शिव आरतीने वातावरण भक्तिमय झाले. पाचवीतील विद्यार्थ्याने सादर केलेला प्रभावी पोवाडा आकर्षण ठरला. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे केली. सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ऊर्जावान नृत्य लक्षवेधी ठरले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या जोरदार शिवगर्जनेमुळे वातावरण भारले.
एच. ए. स्कूल
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत (एच. ए. स्कूल) स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांची जयंती चिंतन दिन साजरा झाला. यानिमित्त कब बुलबुलचे एक दिवसीय शिबिर झाले. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रम झाले. बडी सलामी व कब ग्रीटिंगने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कलर पार्टी द्वारे ध्वजवंदन झाले. समीक्षा इसवे, अनिता येनगुल, अनघा कडू ,अर्चना गोरे यांनी स्काऊट झेंडा गीत, बुलबुल प्रार्थना, ‘बेडन पॉवेल तेरे बच्चे हम’ ही गाणी सादर केली. अर्चना गोरे यांनी कब बुलबुलचा स्कार्फ देऊन आमंत्रितांचे स्वागत केले. पुष्पा राऊत यांनी चिंतन दिनाची माहिती दिली. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी गोष्टीतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यशस्वी प्राथमिक-माध्यमिक
यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये स्काऊट गाईड चिंतन दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय स्काऊट गाईड शिबिर घेण्यात आले. विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते व मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांनी शिबिर घेतले. यावेळी पुणे जिल्हा स्काऊट गाईड संस्थेच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त अंजु सोनवणे व पुणे जिल्हा गाईडच्या प्रशिक्षण समन्वयक अनघा दिवाकर, वदंना आल्हाट, महेश तापकीर उपस्थित होते. प्रारंभी लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली व झेंडा गीत गायन केले. यानिमित्ताने विद्यालयात कुकिंग कॅम्पही झाला.
मुथा कन्या प्रशाला
सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत चिंतन दिनानिमित्त स्काऊट व गर्ल गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी ओलेव्ह बेडन पॉवेल यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन करून प्रार्थना व झेंडागीत गाण्यात आले. प्राचार्या सारंगा भारती यांनी प्रास्ताविक केले. यानिमित्ताने डोलारे प्रतिक्षा, बागवान सादिया, अनुष्का जाधव, भार्गवी हरीदास, प्रियांका चिलवंत, आदिती वाजे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले, तसेच स्काऊट-गाईड क्लॅप, नियम, वचन याबाबतची प्रात्यक्षिके सादर केली. गाईड शिक्षिका अर्चना भोर यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने जिल्हा मेळाव्यातील सहभागी विद्यार्थिनींना सहभाग प्रमाणपत्रांचे तर शिक्षकांना सन्मानपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन पर्यवेक्षक शशिकांत हुले, गाईड शिक्षिका मनिषा पारधी, मनिषा लोखंडे, पायल कांबळे, पुजा पाटील, रमेश कुत्तरवाडे व प्रदिप घोटकुले यांनी केले. सुजाता गोरडे यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापिका सुषमा बंब यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

