सोनसाखळी चोरट्याला नागरिकांनी पकडले
पिंपरी, ता. २३ : तीन वर्षीय मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना हिंजवडी फेज एक येथील नारायण कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये घडली. अमोल मोहन जाधव (रा. भाजी मंडई जवळ, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी किरण हनुमंत कांबळे (रा. शिंदेवस्ती, मारुंजी, मूळ- बुलडाणा यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या त्यांची तीन वर्षीय मुलगी आराध्या हिच्यासह आठवडे बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. दरम्यान, तेथे असलेल्या आरोपीने आराध्या हिच्या गळ्यातील सहा हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. हा प्रकार घडताच तिच्या आईने आरडाओरडा केला. दरम्यान, तेथे जमा झालेल्या नागरिकांनी आरोपीला पकडले. त्याला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

