पर्यावरण विभागाची माहितीच अपूर्ण
आरएमसी प्लान्टला परवानाही देताना ती दोन श्रेणीमध्ये दिली जाते. व्यावसायिक व कॅप्टिव्ह. व्यावसायिक आरएमसी प्लान्ट हे स्वतंत्र ठिकाणी असतात. तेथून इतर बांधकाम आस्थापनांना रेडी मिक्स काँक्रीट पुरविले जाते. मात्र, कॅप्टिव्ह आरएमसी प्लान्ट हे बांधकाम साइटवरच असतात. सध्या महापालिकेने परवानगी दिलेले ६५ आरएमसी प्लान्ट पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत आहेत. मात्र, कॅप्टिव्ह आरएमसी प्लान्टची आकडेवारी मात्र पर्यावरण विभागाकडे नाही. यावरून या विभागाकडील माहिती अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले.
कॅप्टिव्ह प्लान्टसाठी नियमावली
- हे प्लान्ट व्यावसायिक प्लान्ट म्हणून कार्यरत राहू शकत नाहीत
- या प्लान्टला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मान्यता दिली जाते
- ज्या बांधकाम आस्थापनासाठी या प्लान्टला संमती आहे.त्याचे काम पूर्ण झाल्यावर प्लान्ट बंद करणे बंधनकारक
- याशिवाय व्यावसायिक आरएमसी प्लान्टसाठी असणाऱ्या प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे पालन कॅप्टिव्ह प्लान्टनेही करणे आवश्यक
-----

