पिंपरी-चिंचवड
मराठी भाषा गौरवदिनानिमित्त पालिकेतर्फे विविध कार्यक्रम
पिंपरी, ता. २४ : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान महापालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता. २५) ऑटो क्लस्टर सभागृहात माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष व्याख्यान होईल. शुक्रवारी (ता. २७) ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा नागरी सन्मान होईल. दुपारी १२ वाजता ‘माय मराठीची गौरवगाथा’, दुपारी ३ वाजता निमंत्रितांचे कवीसंमेलन, दुपारी ४ वाजता ‘अभिजात मराठी भाषेचे वैभव’ विषयावर परिसंवाद, सायंकाळी ६ वाजता ‘आवाज लोकगीतांचा... गंध मराठी मातीचा...’ कार्यक्रम होईल, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.

