पीएमपी चालकांकडून ‘बस बे’चे उल्लंघन

पीएमपी चालकांकडून ‘बस बे’चे उल्लंघन

Published on

पिंपरी, ता. २५ : प्रवाशांच्या सुविधेसाठी थांब्यावर ‘बस बे’ आखून दिले आहेत. पण, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) चालकांकडून थांब्यावर आखून दिलेल्या ‘बस बे’ ऐवजी मागे, पुढे अथवा रस्त्यामध्येच बस थांबवल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका पत्करून बसमध्ये चढ-उतार करावी लागत आहे. याबाबत पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक यशवंत हिंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात सेवा दिली जाते. या सर्व भागात दोन्ही बाजूंचे साधारण नऊ हजारांपेक्षा जास्त थांबे आहेत. पण, अनेक वेळा चालक बस थांब्यावर उभी करण्याऐवजी रस्त्यामध्येच उभी करतात. तर, कधी बस थांब्यापुढे अथवा मागे उभी केली जाते. प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेता पीएमपी प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांकडे ‘बस बे’ आखून देण्याची मागणी केली होती. दोन्ही महापालिकांनी काही महत्त्वाच्या रस्त्यांवर असलेल्या थांब्यांवर बस उभी करण्यासाठी ‘बस बे’ आखून दिले. पण, काही बसचालक नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून येत आहे. शहरातील निगडी, पिंपरी, चिंचवड, तळवडे, भोसरी, नाशिकफाटा आदी परिसराची पाहणी करण्यात आली. त्यावेळी अनेक पीएमपीच्या बस या ‘बस बे’ ऐवजी मागे पुढे अथवा बाजूला उभ्या राहत असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवाशांना बससाठी धावाधाव करावी लागत असल्याचे दिसून आले. शिवाय, बस मध्येच थांबल्याने वाहतूक कोंडीही होत आहे. रस्त्याच्या मध्ये प्रवाशांना उतरवले जात असल्याने मागून येणारे वाहन धडकून अपघाताचा धोका आहे.
या स्थितीकडे पीएमपी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर भोसरीपासून ते मोशी टोल नाक्यापर्यंत पीएमपी बस रस्त्याध्येच थांबवण्याचे प्रमाण वाढले आहे. बस चालक मनमानी करतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना पाहिजे.
- विकास खरे, प्रवासी

पीएमपी चालक बस रस्त्याच्या मध्येच थांबवतात. बस थांब्याजवळ थांबवल्या जात नाहीत. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागते. त्यामुळे अपघात होत आहेत. प्रशासनाने या बेशिस्त चालकांवर कारवाई करावी.
- राजीव काळे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com