उद्योगनगरीत ‘पतझड’; शहरवासीयांची परवड
अश्विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २५ ः पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या वर पोचली आहे. लोकसंख्येबरोबरच वाहनेही वाढत आहेत. लोकसंख्येच्या गरजा पाहता मेट्रो, बीआरटी, डीपी रस्ते यांसारखी विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र, विकासकामांसाठी शहरात सर्रास वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड केल्यानंतर पाचपट झाडे लावण्याच्या नियमालाही प्रशासनाने हरताळ फासल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील वृक्षसंपदा दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामी, तापमानवाढ, प्रदूषण, जमिनीची धूप या सर्व प्रश्नांना पिंपरी चिंचवडकरांना तोंड द्यावे लागत आहे.
सात लाख वृक्ष लागवडीचा पालिकेचा दावा
एक झाड तोडल्यानंतर त्याबदल्यात पाच झाडे लावण्याचा नियम आहे. महापालिकेकडून झाडे तोडण्यास परवानगी घेतल्यानंतर मात्र संबंधितांना याचा विसर पडलेला दिसतो. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिली तर वृक्षतोडीच्या तुलनेत करण्यात आलेले पुनर्रोपण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. वृक्षतोडीचा आकडा २०२१-२२ मध्ये सर्वाधिक म्हणजे ९ हजारच्या घरात आहे. मात्र याच वर्षात तुलनेने कमी पुनर्रोपण झालेले दिसते. दुसरीकडे महापालिकेने मात्र गेल्या पाच वर्षांत पाच वर्षांत सात लाख वृक्षलागवड केल्याचा दावा केला आहे. जर वर्षाला एक लाख वृक्षांची लागवड होत असेल तर प्रदूषणात का घट होत नाही असा प्रश्नही विचारला जात आहे.
पुनर्रोपणाची संख्या कमीच
वर्ष तोडलेली झाले झालेले पुनर्रोपण
२०२० - २०२१ ः ३०६३ ६७५
२०२१- २०२२ ः ८९८५ ९६०
२०२२ - २०२३ ः १४०० ५१९
२०२३ - २०२४ ः २७६३ १२८२
ऑक्टोबर २०२४ पर्यंत ः१२६८ ८०६
एकूण ः १७४७९ ४२४२
महापालिकेने केलेली वृक्षलागवड
२०२१ ः १ लाख १२ हजार६७६
२०२२ ः ३ लाख ०२ हजार ५१७
२०२३ ः १ लाख ३० हजार ८५०
२०२४ ः १ लाख ७३ हजार ५७६
२०२५ ः ५० हजार ७४८
---
अहवालात आकडेवारीच नाही
महापालिका एका बाजूला लाखो वृक्षलागवडीचा दावा करत आहे. महापालिकेच्याच पर्यावरण सद्यःस्थिती अहवालात मात्र याची कोणतीही आकडेवारी देण्यात आलेली नाही. दुसरीकडे वृक्षलागवड करूनही हरित क्षेत्र वाढल्याचे चित्र दिसत नाही. पिंपरी चिंचवडच्या एकूण क्षेत्रफळापैकी ५९ टक्के क्षेत्रफळ हे निवासी भागासाठी आहे. त्यापाठोपाठ ९ टक्के क्षेत्र औद्योगिकीकरणाखाली आहे. सर्वात कमी क्षेत्र शेतीखाली आहे, तर केवळ पाच टक्के क्षेत्र हे बागा व मैदानांसाठी आहे. तब्बल ९७१ हेक्टर क्षेत्रफळाचा विकास झालेला नाही. पर्यावरण सुधारण्याच्या द्दष्टीने या क्षेत्राचा विचार केला जाईल, अशी महापालिकेची योजना सध्या तरी दिसत नाही.
पिंपरी चिंचवडमधील एकूण क्षेत्र ः १७३१२ हेक्टर
१. विकसित करण्यायोग्य क्षेत्र ः १५,८२३ हेक्टर
निवासी क्षेत्र ः ९२९८ हेक्टर
व्यावसायिक ः १७४ हेक्टर
औद्योगिक ः १४२४ हेक्टर
सार्वजनिक व निमसार्वजनिक ः ९८६ हेक्टर
बागा, मैदाने व मनोरंजनाची ठिकाणे ः ८६४ हेक्टर
सार्वजनिक उपयुक्तता ः ३२७ हेक्टर
वाहतूक ः २७७१ हेक्टर
संरक्षण - ४ हेक्टर
२. अविकसित क्षेत्र ः १४८९ हेक्टर
विकास नाही ः ९७१ क्षेत्र
पाणी संस्था ः ३७४
जंगल व टेकड्या - १४४
क्षेत्रीय कार्यालय वृक्षसंख्या
अ - ३ लाख ६ हजार ९४
ब - ४ लाख ६२ हजार १३७
क - ३ लाख ५१ हजार १७३
ड - ५ लाख १२ हजार ३६८
इ - ८ लाख ४३ हजार ८२४
फ - ७ लाख ४१ हजार २०६
एकूण ३२ लाख १६ हजार ७९
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

