सकाळ संवाद
नागरिकांच्या घरात मैलामिश्रित पाणी
भोसरी येथील शांतीनगर, आनंदनगर मधील काही नागरिकांच्या घरात मैलामिश्रित पाणी शिरले आहे. यामुळे मागील १० ते १५ दिवसांपासून या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आजारी पडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने या परिसरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची तपासणी करून त्वरित योग्य ती उपाययोजना करावी.
- शाम लोंढे, भोसरी
98832
अनधिकृत रिक्षा थांब्यामुळे अडचण
पिंपळे गुरव, सृष्टी चौकातील अनधिकृत रिक्षा थांब्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वाहतूक शाखेने या समस्येकडे लक्ष देऊन येथील वाहतूक व्यवस्था कोलमडणार यासाठी नाही या अनूषंगाने, कायमस्वरूपी रिक्षा थांब्याला अटकाव करावा, तसेच येथे अनधिकृतरीत्या रिक्षा उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
- नितीन सोनवणे, पिंपळे गुरव
98834
मोरवाडी चौकात वाहतुकीचा खोळंबा
मोरवाडी चौकातील वाहतूक व्यवस्थेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पिंपरी ते निगडी मेट्रो कामासाठी करण्यात आलेल्या बॅरिकेडिंगमुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतूक कोंडी वाढली आहे. ज्या ठिकाणी ‘बॉटलनेक’ तयार होतो, त्या ठिकाणी सुरळीत वाहतुकीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. रिक्षाचालकांकडून अनियमित थांबे, रस्त्याच्या मधोमध प्रवासी चढ-उतार यामुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होते. यावर कारवाई करण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांच्या आणि मेट्रो प्रवाशांच्या वाहनांवर कारवाई होताना दिसते. चौकात हातगाड्या व अनधिकृत विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यावर ठोस कारवाई होत नाही. पालिकेने ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून सायकल ट्रॅक व पदपथ उभारले, परंतु त्यावर लगेचच स्टॉल, पार्किंग आणि इतर अतिक्रमण सुरू झाले आहे. त्यामुळे पादचारी आणि सायकलस्वारांना सुरक्षित मार्ग उरलेला नाही.
- दीपक कदम, चिंचवड
अनधिकृत पार्किंगचा अडथळा
रावेत जवळील मोकळ्या जागेवर फळविक्रेत्यांच्या टपऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. विक्रेत्यांकडे येणारे ग्राहक त्यांची वाहने रस्त्यावरच उभी करतात त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. या अतिक्रमणामुळे पदपथ मोठा आणि रस्ता अरुंद झाला असल्याने चित्र आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने या अतिक्रमणावर कारवाई करून हा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यावा.
- शिवाजी ओंबळे, पुनावळे
98835
---
समतल विलगकात सुधारणा आवश्यक
मोरवाडी येथे समतल विलगकामध्ये मोठे कंटेनर अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रस्त्याचे डांबरीकरण करताना उंची बदलली गेली, मात्र त्याचा योग्य तांत्रिक विचार झाला नसल्याचे दिसते. परिणामी रोज नागरिकांना विनाकारण वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. ही समस्या केवळ वाहतूक कोंडीपुरती मर्यादित नाही, तर नागरिकांच्या वेळेचा, इंधनाचा आणि मानसिक स्वास्थ्याचाही प्रश्न आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहेत.
- एक वाचक, मोरवाडी
बांधकाम साहित्यामुळे नागरिक त्रस्त
मागील एक वर्षा पासून भोसरीतील गव्हाणे वस्ती परिसरात इमारतीचे बांधकाम चालू आहे. हे बांधकाम मागील दोन तीन महिन्यापासून बंद असून बांधकामासाठी लागणारी क्रशसेंड, खडी रस्त्यावर पसरली असून धुळीचा त्रास होत आहे. तसेच खडीमुळे वाहने घसरून अपघाताच्या घटना देखील घडत आहेत. या संदर्भात महापालिकेच्या ‘सारथी हेल्प लाईन’ला वारंवार तक्रार करूनही अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नाही. संबंधित विभागाने या समस्येची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
- संदीप मूळे, गव्हाणे वस्ती, भोसरी
98836
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

