टपाल कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
चिंचवड, ता. २५ ः टपाल विभागाच्या पुणे शहर पूर्व विभागाच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड उपविभागातील टपाल कर्मचाऱ्यांसाठी ध्यान योग शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे चिंचवड मुख्य टपाल कार्यालयामध्ये नुकतेच आयोजन करण्यात आले.
ध्यान शिबिरासाठी पुण्याच्या विहंगम योग संस्थेचे आनंद असोदकर व त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासोबतच विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये १५ टपाल कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले, तर १०० पेक्षा जास्त टपाल कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
पुणे शहर पूर्व विभागाचे प्रवर अधीक्षक समीर महाजन यांनी कार्यक्रमांसाठी पुढाकार घेतला. चिंचवड मुख्य टपाल कार्यालयाचे वरिष्ठ डाकपाल चंद्रकांत भोर, डेप्युटी पोस्ट मास्तर शरद लोहकरे, पिंपरी पीएफ टपाल कार्यालयाचे डाक निरीक्षक के. एस. पारखी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

