प्रतिक्रिया..

प्रतिक्रिया..

Published on

मी वाकडमध्ये राहते. येथील दत्त मंदिर रस्त्याच्या दुतर्फा झाडे होती. पाच वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामासाठी ती तोडण्यात आली. तर, रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. झाडेही लावण्यात आलेली नाहीत. वाकडमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे वातावरणात धूळ, सिमेंटचे कण पसरत आहेत. झाडांवर सिमेंटचा थर जमा झालेला असतो. ही धूळ आणि सिमेंटचे कण सर्वांच्याच आरोग्यासाठी धोकादायक आहेत. माझ्या सासूबाईंना या प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा गंभीर आजार झाला होता. त्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. वाकडकरांचे जीवन दयनीय झाले आहे.
- डॉ. स्वप्नाली संसारे, सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ

पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील हवेची गुणवत्ता ढासळल्याची माहिती ‘सकाळ’मधून समजल्यावर खूपच धक्का बसला. ही परिस्थिती पुढील पिढ्यांसाठी धोक्याची आहे. दोन्ही शहरांच्या सर्व बाजूंनी गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. या प्रकल्पांमधून फक्त राहण्याच्या क्षमतेबाबत आश्वासने दिली जात आहेत; जीवनमानाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही ठोस हमी नाही. या महत्त्वाच्या मात्र दुर्लक्षित विषयाला कोणत्याही दबावाशिवाय लोकांसमोर आणल्याबद्दल ‘सकाळ’चे मनापासून आभार. राज्य आणि केंद्र सरकारने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे. यासाठी नागरिकांनीही ठाम भूमिका घेणे अत्यावश्यक आहे.
- अमित अहिरराव, सेक्टर १३, पिंपरी चिंचवड

गेल्या तीन-चार महिन्यांपासून हवेची गुणवत्ता खूप खराब आहे. सर्वसामान्य नागरिक व पत्रकार हे निदर्शनास आणून देत आहेत. पण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीही कार्यवाही करत नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही काही हालचाल केलेली नाही. हवा प्रदूषण कसे कमी केले जाऊ शकते, हे सर्वसाधारण लोकांना कळते. पण, अधिकारी वर्गाची इच्छाशक्ती दिसत नाही. त्यांना बिल्डर लॉबी आणि त्यांचे साटेलोटे आहे का? असा प्रश्न पडतो. बेकायदा आरएमसी प्लँट आणि बांधकाम साहित्यांची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली, तरच प्रदूषण कमी होईल.
- विठ्ठल बरळ, पुनावळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com