दुध-तूप दरवाढीमुळे परराज्यातील गोपालकांचा व्यवसाय नफ्यात
सोमाटणे, ता.२६ ः दुध, तूप व गायींच्या किमती वाढल्याने परराज्यातील गोपालकांच्या व्यवसायाची वाटचाल नफ्याकडे होत आहे, अशी माहिती राजस्थान येथील गोपालक राठोड यांनी माहिती दिली.
मागील अडीच दशकापूर्वी चाऱ्याच्या शोधात राजस्थान आणि गुजरातमधील अनेक गोपालक दरवर्षी नोव्हेंबरनंतर मावळच्या ग्रामिण भागात वास्तव्यास येतात. सहा महिन्याच्या वास्तव्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतात, असा त्यांचा दरवर्षीचा दिनक्रम आहे. महाराष्ट्रात गीर गायीला चांगली मागणी असल्याने दूध देणाऱ्या गायींची विक्री हा त्यांचा उत्पादनाचा मुख्य मार्ग आहे. परंतु संत तुकाराम सहकारी साखर कारखाना झाल्याने गोपालकांना चाऱ्यासाठी आवश्यक असलेला ऊस, उसाचे वाढे व गोठ्यासाठी कारखान्याची जागा मिळाल्याने काही गोपालकांनी अधिक उत्पन्नासाठी प्रायोगिक तत्त्वावर वर्षभर येथेच वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. या वास्तव्य काळात त्यांना दूध देणाऱ्या गायींच्या विक्रीबरोबरच गायींचे दुध, तुप, खत यालाही चांगली मागणी असल्याने त्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली. अशी माहिती राठोड यांनी दिली. स्थानिक बाजारपेठ चांगली मिळाली त्यांनी गीर गायीबरोबर म्हशींचेही पालन सुरु केले आहे.
PNE26V9901
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

