पदपथ चालण्यासाठीच अधिक धोकादायक
पिंपरी, ता. २६ ः शहरांमधील अनेक पदपथांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक उखडलेले, पदपथांवरील सांडपाणी वाहिन्यांचे झाकण निघाल्याने पादचाऱ्यांचा हक्क हिरावला गेला आहे. अनेक भागांत पदपथ चालण्यासाठी अत्यंत धोकादायक झाले आहेत. पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे.
शहरात मुख्य रस्त्यांवर पदपथ असूनही ते वापरण्यायोग्य नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. पिंपरीगाव, चिंचवड, थेरगाव, पिंपळे निलख आदी परिसरात पदपथाची दुरवस्था झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पिंपळे निलखमधील डीपी रस्त्यावर पदपथावर केबल टाकल्याची तक्रार रवींद्र आवटे यांनी केली.
‘‘पिंपरीगाव टपाल कार्यालयासमोर शहरात पदपथांची दुरवस्था आहे. पदपथावरील सांडपाणी वाहिनीच्या बाजूस मोठा खड्डा पडला आहे. तेथे ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते, तसेच दुचाकी गाड्यांची वाहतूक असते. पिंपरीगाव ते रहाटणी पुलापर्यंत सिमेंट रस्ता झाला आहे. परंतु पश्चिम बाजूचा पदपथ दोन तीन ठिकाणी अपूर्ण आहे. पथदिव्याकरिता पोल बसविणे अजून, काम बाकी आहे. पोल बसविण्यासाठी बोल्ट बेंड झाले आहेत व केबल वरून गाड्या जाऊन खराब होत आहेत.
- शरद पाचणकर, पिंपरीगाव
थेरगाव येथील ॲक्सिस बॅंक एटीएमसमोरील पदपथांची गेल्या अनेक दिवसांपासून अशी दुरवस्था झाली आहे. कावेरीनगर पोलिस लाइन रोड, स्टॉप नं.१६ येथील पदपथावरील ब्लॉक उखडलेले आहेत. दुरुस्ती केली जात नाही.
- सुहास होनराव, थेरगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

