मेट्रोच्या डब्यांची संख्या वाढवा
पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दररोज हजारो नागरिक प्रवास करत आहेत. मात्र, सध्या मेट्रोला केवळ तीनच डबे असल्याने प्रचंड गर्दी होत आहे. अनेकांना उभे राहून प्रवास करावा लागत असून, चढताना-उतरताना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मेट्रोला आणखी एक-दोन डबे जोडावेत.
- शिवराम वैद्य, निगडी
जंगली महाराज नगर परिसरात बांधकामाचा राडारोडा
पिंपळे गुरव येथील जंगली महाराज नगर परिसरात गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने बांधकामातील राडारोडा टाकला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. यावर तातडीने उपाययोजना करावी.
- मिथिला हरळीकर, पिंपळे गुरव
PNE26V99098
ताथवडेतील इंजिनिअरिंग कॉलेज रस्त्यावर खड्डे
ताथवडे येथील इंजिनिअरिंग कॉलेज जवळील रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वाहनचालक व पादचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर दररोज सांडपाणी येते. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून, त्यातूनच प्रवास करावा लागतो. सारथी ॲपवर तक्रारी करूनही दखल घेतली नसल्याने रस्ता तातडीने दुरुस्त करावा.
- वैशाली पलक, पिंपळे निलख
PNE26V99099
तालेरा हॉस्पिटल समोरील रस्त्यावर चेंबर खचले
तालेरा हॉस्पिटलसमोर रस्त्यावरील तीन चेंबर खचले आहेत. त्यावरून सतत वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी.
- देवबाप्पा, चिंचवड
PNE26V99102
पुनावळे भागात अवजड वाहनांची वाहतूक
पुनावळेमधील सकाळी सात ते नऊपर्यंत लहान मुले शाळेत जातात. त्यांना घेण्यासाठी स्कूल बसेस येतात. पण, त्याचवेळी डंपर, अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. लहान मुलांना रस्ता ओलांडून जावे लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. डंपर वाहतूक बंद करावी किंवा त्यांची वेळ बदलावी. प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे.
- कमलाकर कुलकर्णी, पुनावळे
दापोडीतील पदपथाची दुरवस्था
विनीयार्ड चर्च ते माता शितळादेवी चौक याठिकाणी गेल्या चार महिन्यांपासून पदपथ खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अपघात होण्यापूर्वीच हा पदपथ दुरुस्त करावा.
- रंगनाथ डगळे, दापोडी
PNE26V99104
तळेगाव चौकात रस्त्याची दुरवस्था
तळेगाव स्टेशन चौक ते जिजामाता चौक रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ते खोदून केबल टाकली आहे. पंधरा दिवस उलटूनही हे चर भरले नाहीत. खोल खड्ड्यात वाहने आपटून अनेक वाहने खिळखिळी झाली आहेत. नागरिकांना मणक्याचे आजार उद्भवला आहे. बुधवारी रात्री या ठिकाणी रिक्षाचा अपघात होऊन दोन महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. लवकरात लवकर हे रस्ते दुरुस्त करावे.
- दिलीप डोळस
PNE26V99105
वाकड दत्त मंदिरासमोरील रस्त्याची दुरवस्था
दत्त मंदिर वाकड रोड येथील झुडियोसमोरचा युरो स्कुलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गतिरोधक खराब झाले आहेत. या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक व नागरिकांची ये-जा असते. तरी संबंधित विभागाने गतिरोधक लवकर दुरुस्ती करावी.
- सुभाष चव्हाण, डांगे चौक, थेरगाव
PNE26V99107
बस थांब्यावर निवारा शेड उभारा
दुर्गा नगर, यमुना नगर निगडी परिसरात पीएमपीएमएलच्या थांब्यावर निवारा शेड नाहीत. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना उन्हात उभा रहावे लागत आहे. उन्हाळ्यापूर्वी प्रशासनाने तत्काळ निवारा शेड उभारावे.
- रवींद्र कदम, निगडी
PNE26V99122
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

