उद्योगनगरी त्रस्त; टॅंकरवर भिस्त
पिंपरी, ता. २६ : रावेत पंपिंग स्टेशनमधील वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे मोरवाडी व अजमेरा कॉलनीत भागात पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
‘‘कसेबसे तासभर पाणी येत आहे, त्यामुळे गैरसोय होत आहे. टँकर मागवण्याची वेळ आली आहे. महापालिकेला पाणीपट्टी भरून विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे,’’ असे मोरवाडी व अजमेरा कॉलनी येथील नागरिकांनी सांगितले.
दुरुस्तीच्या कामांमुळे चार दिवस पाणीपुरवठा ठप्प झाला. त्यानंतर तो कमी दाबाने होत असल्यचे नागरिकांनी सांगितले. मासुळकर कॉलनी-अजमेरा कॉलनीतील ‘जे’ सेक्टरमध्ये जुन्या, गंजलेल्या किंवा ब्लॉक झालेल्या जलवाहिनीमुळे पाण्याचा प्रवाह कमी झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.
पाणीपट्टी भरूनही दररोज टँकरचे पाणी घ्यावे लागत आहे. मोरवाडी परिसरात रविवारपासून सलग तीन दिवस पाणी न येणे, दूषित पाणी आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे रहिवासी त्रस्त आहेत.
- विनायक शिंदे, मोरवाडी
महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना झाली नव्हती, तेवढी भीषण पाणी टंचाई गेल्या तीन दिवसांत झाली आहे. तीन दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले, कामगार वर्ग, महिला यांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली आहे. महापालिकेने तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.
- यशवंत कांबळे, मोरवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

