शहरात ‘माय मराठी’चा आज विविध ठिकाणी जागर
पिंपरी, ता.२६ ः मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शहरात शुक्रवारी (ता.२७) माय मराठीचा जागर केला जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका, विविध संस्था, वाचनालये व शाळांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिकेकडून ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा नागरी सन्मान केला जाणार आहे. शुक्रवारी (ता.२७) सकाळी १०.३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर खेडकर यांचे व्याख्यान होईल. दुपारी १२ वाजता ‘माय मराठीची गौरवगाथा’ या संदेश उमप यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी कविसंमेलन, परिसंवाद पार पडतील. तर मराठी लोकगीतांच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता होईल. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी साहित्यिक नंदकुमार मुरडे, नयना बागुल, सुहास घुमरे , मानसी चिटणीस आदी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. शाहूनगर येथील शाहू वाचनालयाच्या वतीनेही शुक्रवारी (ता.२७) पाच वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

