माता रमाई स्मारकाचे ११ एप्रिलाला भूमिपूजन
पिंपरी, ता. २६ ः दीर्घकाळ प्रलंबित त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारकाच्या प्रश्नाकडे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी महापौरांसह महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यावर स्मारकाच्या उभारणीसाठी ११ एप्रिल रोजी भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी जाहीर केले.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे विचार प्रबोधन पर्व आयोजित केले जाणार आहे. त्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत महापौर लांडगे बोलत होते. उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, डॉ. सुहास कांबळे, नगरसेविका सारिका मासुळकर यांच्यासह विविध संस्था, संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. विचार प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्यांची रुजवणूक होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी व्याख्याने, परिसंवाद, ग्रंथप्रदर्शने, चित्रफिती, नाट्यप्रयोग तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर लांडगे यांनी केले.
कार्यकर्त्यांच्या सूचना
- स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, अभ्यासक व वक्ते यांना संधी देणे
- महिला व युवकांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा
- विचार प्रबोधन पर्व संयुक्त नियोजन समिती स्थापन करावी
- वेळापत्रक व कार्यक्रमांचे नियोजन वेळेत जाहीर करावे
- प्रसिद्धी-प्रसारासाठी आधुनिक माध्यमांचा वापर करावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

