सलग सुट्ट्यांमुळे सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडी
सोमाटणे, ता. २८ ः सलग सुट्ट्या व होळीचा सण साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासी नागरिकामुळे शनिवारी (ता. २८) वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी वाढली.
कोकणात होळी सण हा मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो, त्यामुळे नोकरी व्यवसायानिमित्त शहरी भागात स्थायिक झालेले नागरिक सकाळी गावी निघाल्याने महामार्गावर वाहनांची संख्या वाढली. शनिवार, रविवार व होळीच्या सणामुळे असलेल्या सलग सुट्ट्यांची यात आणखीच भर पडली. या सुट्ट्यांमुळे पर्यटक पर्यटनाचा बेत आखून घराबाहेर पडले. पर्यटक व होळीचा सण साजरा करणारे कोकणवासी एकाच वेळी महामार्गावर आल्याने शनिवारी दुपारी महामार्गावर छोट्या वाहनांची संख्या वाढली. परिणाम पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूला दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहतूक धिम्या गतीने सुरु राहिल्याने याचा सर्वाधिक त्रास सोमाटणे येथे उपचारासाठी जाणारे रुग्ण, प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले यांना झाला. तळेगाव वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याने वाहतूक कोंडी कमी झाली.
PNE26V99705
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

