श्रीराम कथा महोत्सवाची चिंचवड येथे सांगता
पिंपरी, ता. २८ : चिंचवड येथील लिंक रस्ता परिसरात आयोजित ‘राम कथा’ महोत्सवाची सांगता झाली. श्री रामनामाचा एक कोटी जप केल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
माधव जोशी यांच्या रसाळ, ओघवत्या आणि अमृतमय वाणीतून कार्यक्रमस्थळी जणु अयोध्यानगरीच अवतरली होती. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचे चरित्र ऐकताना सर्व श्रोते देहभान हरपून जात होते. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांडातील विविध प्रसंग माधव जोशी यांनी बारकाव्यांसह भाविकांपुढे प्रकट केले. दररोज कथेनंतर आरती व महाप्रसादाची जबाबदारी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने घेतली.
यावेळी आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, संघाचे सचिव रवींद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष अशोक नागणे, तुकाराम चिंचणीकर, अभिजित कोरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

